Sunday, September 13, 2026
Homeगडचिरोलीकोरची तहसीलदाराचा मनमानी कारभार.. - अश्लील भाषेचा वापर करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ..

कोरची तहसीलदाराचा मनमानी कारभार.. – अश्लील भाषेचा वापर करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पूर्वीच्या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे ‘सर आँखो पे’ असे दिसून यायचे; मात्र, काळानुरूप हळूहळू बदल होऊ लागला आणि ‘तुम कहा हम कहा’ अशी अवस्था हल्ली निर्माण झाली आहे. आताच्या काळात ‘तू असशील आपल्या घरचा’ असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.अशातच अतिदुर्गम, आदिवासी,बहुल,नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या कोरची तहसीलदाराच्या मनमानी कारभार व काम करवून घेतांना अश्लील भाषेच्या वापरामुळे नायब तहसिलदार सह कर्मचारी वर्ग त्रस्त झाल्याने अखेर महसूल कर्मचारी संघटनेने गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदन सादर करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
सदर प्रकरण असे की,कोरचीचे तहसीलदार प्रशांत गड्डम हे कार्यालयातील महसूल कर्मचारी व नायब तहसीलदार यांना मानसिक त्रास देत अश्लील भाषेचा वापर करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात.संघटनेने याबाबतचे निवेदन काल, १४ ऑक्टोंबरला  जिल्हाधिकारी संजय दैने यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले की,कोरची तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार व महसूल कर्मचारी तहसीलदारांच्या दबावाखाली काम करीत आहेत. कर्मचारी मानसिक तणावात आहेत.तहसीलदारांच्या त्रासामुळे तहसीलमधील काही नायब तहसीलदार व कर्मचारी वैद्यकीय रजेवर गेले आहेत.मागील वर्षी गोदाम  लिपिकाचा मानसिक तणावाने मृत्यू झाला.शिवीगाळ व दबाव टाकलेल्या प्रसंगाचे ऑडिओ रेकॉर्डिंग महसूल संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन केली आहे; अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनिश्याम येरमे, सरचिटणीस गौरीशंकर देंगे, महिला प्रतिनिधी सोनाली कंकलवार, संघटक अल्पेश बारापात्रे उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. – गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत.पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!