- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूर ग्रामीणच्या बोखारा ग्रामपंचायत मधील कोट्यवधींच्या कर वसुली घोटाळा प्रकरणात विस्तार अधिकारी व चार ग्रामसेवक असे एकूण पाच जण निलंबित करण्यात आले आहे.चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. यात सेवानिवृत्तांचाही समावेश असल्याने त्यांची विभागीय चौकशी होणार आहे.दोषींकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
बोखारा ग्रामपंचायतीत कर वसुलीत घोटाळा झाल्याचा मुद्दा सर्वप्रथम जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला होता.त्यावर बैठकीत चौकशीचे आदेश देण्यात आले होते.त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या घोटाळ्याची तक्रार करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.त्यावर बावनकुळे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले होते.मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी अतिरिक्त सीईओ कमलकिशोर फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली होती. चौकशी समितीने आपल्या अहवालात बोगस पावत्यांवर कर वसुली केल्याचा ठपका ठेवला होता. या प्रकरणात विस्तार अधिकारी व चार ग्रामसेवकांना जबाबदार धरण्यात आले तसेच ग्रामपंचायतीच्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
२०२०-२२ सालापासून बोखारा ग्रामपंचायतीत कर घोटाळा सुरू होता.यादरम्यान सहा ते सात ग्रामसेवक वेगवेगळ्या कालावधीत कार्यरत होते.यातील काही सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांच्यावरही या प्रकरणात कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
- Advertisement -

