उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील नावारूपास आलेल्या व अनेक वर्षांपासून उत्कृष्टरित्या कार्य करणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती कोंढाळा अंतर्गत डाॅ.श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन विकास योजणे अंतर्गत आज ६ जून २०२३ रोजी गावातील प्रत्येक कुटुंबास १०८० थंड पेयजल कॅनचे वाटप वडसा वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व संयुक्त वन व्यवस्थापन समिती कोंढाळा समितीचे अध्यक्ष नितीन राऊत,ग्रामपंचायत सरपंचा अपर्णा राऊत,वनरक्षक सलीम सय्यद, पोलीस पाटील किरणताई कुंभलवार,तंटामुक्ती समिती अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार, ग्रामपंचायत सदस्य सर्व,गावातील पदाधिकारी,प्रतिष्ठित मान्यवर व इतर लोकसेवक यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
गावातील नागरिकांकडून प्रति कुटुंब थंड पेयजल कॅनच्या मागे १०० रुपये घेण्यात येत असल्याने अनेक गावातील नागरिकांच्या मनात शंका-कुशंका निर्माण झाली होती.मात्र वडसा वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक चव्हाण यांनी गावातील नागरिकांच्या शंका -कुशंकेचे निराकरण केल्याने सर्व गावातील नागरिकांचे समाधान झाले व थंड पेयजल कॅनसाठी नागरिकांनी एकच जमाव केला होता.काही गावांमध्ये मोफत कॅनचे वाटप करण्यात आले असले तरी अनेकांचा उद्देश वेगवेगळा असतो.काही गावांमध्ये कर वसुली व्हावी वा इतर अशी अनेक कारणे असू शकतात.मात्र अनेकांना ऐतखाऊची सवय जडलेली असते.त्यानुसार एखादा टोचन देत असतो व मागे हटत असतो.भोगावे लागते ते मात्र सर्वसामान्य जनतेलाच; जी वस्तू वा इतर गोष्टी फुकटात मिळते; त्याची किंमत अनेकांना कळत नसते.त्यामुळेच ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे होतांना दिसून येते. म्हणतात ना…चांग भलं करावयास गेले तर चोरांच्या उलट्या बोंबा व अशातच ‘अती शहाणा त्याचा बैल रिकामा’ हे नेहमीच होत असते.त्यामुळे कुणाच्याही भुल थापांना बळी पडू नये; असे उद्रेक न्युज च्या वतीने कळविण्यात येत आहे.