Saturday, June 20, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा...

कोंढाळा येथे ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(देसाईगंज):-भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा स्वातंत्र्यदिन देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आज,गुरुवार दिनांक-१५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
“थोर महात्मे होऊन गेलेत चरित्र त्यांचे पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे,हाच सापडे बोध खरा”..
देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या व लढा उभारून इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटका करणाऱ्या वीर जवान,क्रांतिकारक,थोर महात्मे व जननायक यांनी पूर्वी केलेले कार्य अविस्मरणीय,न विसरण्यासारखे असल्याने भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा स्वातंत्र्यदिन आज संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज कोंढाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात,नवीन हनुमान मंदिर मुख्य चौक,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लोकमान्य टिळक विद्यालयाचे प्रांगणात तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रांगणात गावातील मान्यवरांच्या हस्ते सकाळच्या सुमारास ध्वजारोहण करण्यात आले.दिनांक-१३ ऑगस्ट पासूनच शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था व इतर शासनाच्या अखत्यारीतील विभागांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.अशातच आज सरपंचा अपर्णा राऊत यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण करण्यात आले तर नवीन हनुमान मंदिर मुख्य चौकातील ध्वजारोहण उपसरपंच गजानन सेलोटे,जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे व शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रांगणातील ध्वजारोहण कंपनीचे अध्यक्ष सुनील पारधी यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय ध्वज फडकवील्यानंतर मानवंदना,राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गाऊन गावातील  मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,पोलीस पाटील किरणताई कुंभलवार,माजी महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गडचिरोली रोषनिताई पारधी,माजी पं.समिती उपसभापती नितीन राऊत,ग्रामपंचायत सदस्य संदीप वाघाडे,सदस्या भुमेश्र्वरी गुरनुले,नलिना वालदे,प्रतिभा राऊत,कल्पना झीलपे,गोकुल ठाकरे,प्रफुल मेश्राम,तंटामुक्ती समिती अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,उपाध्यक्ष भास्कर पत्रे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील पारधी,उपाध्यक्ष पवन खोब्रागडे,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,माजी सरपंच कैलास राणे,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे, शिक्षक संतोष टेंभुर्णे,लालचंद धबेकर, लोकमान्य टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख,सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी ढेकवार, पत्रकार नितेश पाटील,माजी सरपंचा मंगला शेंडे,अनिता शेंडे,अनिता चौधरी, नागोराव उके,निखिल गोरे,पंढरी नखाते,नामदेव पारधी,नामदेव वसाके,ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप तुपट,अजय भर्रे,शाळेतील शिक्षकवृंद,उमेदचे सर्व महिला कर्मचारी,आशा वर्कर,आरोग्य उपकेंद्रचे डॉक्टर,कर्मचारी वृंद,अंगणवाडी सेविका,मदतनीस,शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी,प्रतिष्ठित नागरिक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!