उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतर्फे समर कॅम्प तथा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन १४ एप्रील ते ५ मे २०२३ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनापासून ते ५ मे २०२३ पर्यंत शाळेतर्फे विद्यार्थ्यांकरीता ‘समर कॅम्प’ च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
हल्ली सगळीकडेच शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना सुरुवात झाली आहे.अशातच कोंढाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘समर कॅम्प’ आयोजित केला आहे.यामध्ये हसत-खेळत इंग्रजी स्पीकिंग कोर्स,डान्स कोचिंग,इंग्रजी कर्सिव्ह रायटिंग कोर्स,वाचन कथा गोष्टींचे व इतर उपक्रम राबविले जात आहेत.शाळेची प्रमुख वैशिष्टे व उपक्रम यात इयत्ता १ ते ७ पासून सेमी इंग्रजी,डिजिटल शाळा,शालेय बालोद्यान,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, प्रशिक्षित शिक्षक वर्ग,बाल वाचनालय,खेळाचे भव्य मैदान,मूल्यवर्धक परिपाठ,सुसज्ज इमारत,ई-लर्निग व इतर अनेक अशी शाळेची वैशिष्ट्ये व उपक्रम राबविले जाणार आहेत.तसेच सांस्कृतिक महोत्सव ३ मे ते ५ मे २०२३ या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

१४ एप्रिल २०२३ रोजी घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी शाळेतील विद्यार्थ्यांकरिता ‘समर कॅम्प’समारंभास सुरुवात करण्यात आली असून ‘समर कॅम्प’ समारंभाचे उद्घाटनीय अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेषराव नागमोती,उद्घाटक कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,विशेष अतिथी प्रतिमा चौधरी,वैष्णवी वांढरे,दिव्या बुराडे,भावना भानारकर,तंटामुक्ती समिती अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष भाऊराव पत्रे,पोलीस पाटील किरणताई कुंभलवार,पंढरी नखाते,रविंद्र बुराडे,विद्या निकेतन शाळेचे मुख्याध्यापक देशमुख,रोशनीताई पारधी माजी सभापती महिला व बालकल्याण विभाग जि.प.गडचिरोली,केंद्रप्रमुख मेघराज बुराडे उपस्थित होते.तर प्रमुख मार्गदर्शक विजय बन्सोड विभागीय अध्यक्ष दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया प्रामुख्याने उपस्थित होते. सदर समर कॅम्पच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांना गणवेश, टोपी आणि नोटबुक वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक अनिल मुलकलवार,संचालन संतोष टेंभुर्णे आणी आभार लालचंद धाबेकर यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता शाळेतील शिक्षिका तथा समर कॅम्प प्रमुख माधुरी रामगुंडे,रेखाताई चौधरी,रजनी जांभुळकर,शिल्पा सातेवारनिरुपारा देशपांडे,भिमाताई ठवरे व सुरेश आदे यांनी अथक परिश्रम घेतले.