उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :- देसाईगंज शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ७ फेब्रुवारी २०२३ ला कोंढाळा येथे नवमतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून गावातील नवमतदार नागरिकांना जागृत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.रॅली नंतर मार्गदर्शक म्हणून एम.ए. मेहर तहसील कार्यालय देसाईगंज यांनी मतदार नोंदणी विषयी गावकऱ्यांना माहिती दिली, विद्यानिकेतन लोकमान्य टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक के.एम.देशमुख,हर्षे सर,जिल्हा परिषद कोंढाळा शाळेतील विध्यार्थ्यानी व ग्रामपंचायत कर्मचारी वर्गांनी व रासेयोच्या स्वयंसेवकांना उत्कृष्टपणे सहभाग घेतला होता.लोकशाहीचे महत्व समजावून सांगितल्या गेले व सोबतच मतदार हा भारतीय लोकशाहीचा कणा आहे.याचे महत्व पटवून देण्यात आले.भारतीय निवडणूक आयोगाला सहकार्य करून आपल्या लोकशाहीला मजबूत करा;असेही रॅलीदरम्यान पटवून सांगितले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान टी.आर.खोब्रागडे यांनी भुषविले तर मुख्य अतिथी सरपंचा अपर्णाताई राऊत,प्रमुख अतिथी मुख्याध्यापक अनिल मुलकलवार यांनी भूषविले होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम.ए.मेहर,उमेश ठलाल तहसील कार्यालय देसाईगंज,तसेच या कार्यक्रमाला गटनिर्देशक आर.एम.गोतमारे,डी.वि.सूर आणि औधोगिक प्रशिक्षण संस्था येथील ए.वि.भोले,सी.डी.समर्थ, बी.बी.घरडे,हेमंत मरसकोल्हे,सतीश मेश्राम,लता लाडे, एस.एस.प्रधान व रासेयो समन्वयक सी.एम.गरमळे, सह-समन्वयक व्ही.वाय नागमोती उपस्थित होते.
सदर कार्यक्रम एस.एस.चौधरी प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले.