Tuesday, July 7, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा ग्रामपंचायतीला यवतमाळ जिल्ह्यातील मूल्यांकन समितीची भेट.. - पंचायतराज अभियानांतर्गत विकासकामांची...

कोंढाळा ग्रामपंचायतीला यवतमाळ जिल्ह्यातील मूल्यांकन समितीची भेट.. – पंचायतराज अभियानांतर्गत विकासकामांची पाहणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-मुख्यमंत्री-समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आज,रविवार १० मे रोजी देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायतीला यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील पंचायत विभागाच्या मूल्यांकन समितीने भेट देत पंचायतराज अभियानातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विकासकामांसह स्वच्छता,शिक्षण,पर्यावरण संवर्धन व सामाजिक उपक्रमांचे यावेळी मूल्यांकन करण्यात आले.
या दौऱ्यात पंचायत समिती नेरचे गटविकास अधिकारी राजीव शिंदे,सहाय्यक गटविकास अधिकारी गजानन धर्माळे,गट शिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे,सीडीपीओ राजेश घोडे,तालुका व्यवस्थापक तथा प्रविण प्रशिक्षक दिगांबर आडे तसेच ग्रामपंचायत अधिकारी व ग्राम प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध कामांची माहिती घेतली.भेटीदरम्यान प्रशासकीय व्यवस्था,गावातील स्वच्छता अभियान,अंगणवाडी केंद्रातील सुविधा,जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक वातावरण,वाचनालयातील सुविधा तसेच वृक्षलागवड उपक्रमांची पाहणी करण्यात आली.प्रसंगी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे समितीने कौतुक केले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ व सुंदर गाव निर्माण करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, नागरिकांचा सहभाग आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.शाळा व अंगणवाडी केंद्रांतील सुविधा,पोषण आहार व्यवस्था व शैक्षणिक गुणवत्ता यांचीही तपासणी करण्यात आली.यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून विकासात लोकसहभागाचे महत्व अधोरेखित करण्यात आले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे ग्रामपंचायतीत स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन ग्रामीण विकासाला गती मिळत असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा तथा प्रशासक अपर्णा राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे, ग्रामपंचायत सदस्य,वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन राऊत,पोलीस पाटील किरण कुंभलवार,तंटामुक्ती समिती अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पवन खोब्रागडे,प्रतिष्ठित नागरिक पंढरी नखाते,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे,माजी सरपंच कैलास राणे,मंगला शेंडे, अनिता शेंडे,आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी,कृषी विभागाच्या नाकतोडे, शिक्षक,उमेदच्या कर्मचारी,अंगणवाडी सेविका, आशासेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

तारेवर ओले कपडे वाळवायला गेली अन् क्षणात जीव गमावून बसली..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-घरातील कपडे धुवून घराशेजारी असलेल्या विद्युत खांबाच्या बाजूला असलेल्या अर्तींग तारेवर ओले कपडे वाळवतांना विद्युतचा जोरदार शॉक लागून एका ४५ वर्षीय महिलेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!