Thursday, July 16, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा शहरातील जून्या बसस्थानकाचा थांबा पूर्ववत सूरू करा- डॉ.महेन्द्र कुमार मोहबंसी यांची...

कुरखेडा शहरातील जून्या बसस्थानकाचा थांबा पूर्ववत सूरू करा- डॉ.महेन्द्र कुमार मोहबंसी यांची मागणी 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :-शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला जूना बसस्थानक हा रस्ता रूंदीकरण बांधकामाकरीता तोडण्यात आल्याने येथे एस टी बसेस थांबत नाही.त्यामूळे प्रवासी तसेच शाळकरी विद्यार्थाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.येथे एस टी बसेस पूर्ववत थांबविण्यात यावे;अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ.महेन्द्र कुमार मोहबंसी यांनी केली आहे. शहरातून सद्या हायवे महामार्गाचे बांधकाम सूरू आहे. या अंतर्गत रस्ता रूंदीकरणाकरीता येथील जूना बसस्थानक इमारत पाडण्यात आली आहे.त्यामूळे एस टी महामंडळ प्रशासनाने येथील बसचा थांबा बंद केला आहे.याछा फटका येथील सर्व सामान्य प्रवासी,शालेय विद्यार्थांना तसेच या जूना बसस्थानकाला लागूनच उपजिल्हा रूग्णालयाय आहे येथे शेकडोचा संख्येत रोज रूग्न व त्यांचे नातेवाईक बाहेर गावावरून येत असतात.मात्र जुना बसस्थानकाच्या ठिकाणी बसेस थांबणे बंद झाल्याने रूग्न व त्यांच्या नातेवाईकांना सूद्धा पायपीठ करावी लागत आहे.नाईलाजस्तव त्याना खाजगी वाहनाने रुग्णालय गाठावे लागत आहे येथील नविन बसस्थानक हे गावाच्या बाहेर असल्याने प्रवाश्यांना तिथ पर्यंत पायपीठ करने त्रासदायक असल्याने एस टी बसेस चा थांबा पूर्ववत असलेल्या ठिकाणी सूरू करण्यात यावा व याच ठिकाणी शहरात राहत असलेल्या खूला अस्थाई बसथांब्या प्रमाणे खूले बस थांबाचे बांधकाम करण्यात यावे; अशी मागणी डॉ.महेन्द्र कुमार मोहबंसी यांनी केली आहे.येथे बसेस न थांबल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा सूद्धा त्यांनी दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या चार प्रमुख कल्याणकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!