उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ व इतर ठिकानातील किराणा दुकानदार व्यावसायिक किराणा दुकानाच्या आड इतर सामानांसोबतच सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री करीत आहेत.कुणाला न जुमानता राजरोसपणे सुगंधित तंबाखूची विक्री केली जात असल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग गाढ झोपेत असल्याचे दिसून येते.सुगंधित तंबाखूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने सर्वसामान्य जनता तंबाखूच्या आहारी गेल्याचे प्रमाण वाढतच चालले आहे.
जिल्ह्यात मुख्य बाजारपेठेत व इतर ठिकाणी किराणा दुकाने मोठ्या संख्येने स्थायी स्वरूपात असल्याचे दिसून येतात.यातील किराणा दुकानदार हे पैस्याच्या हवास्यापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळून आपले हेतू साध्य करून तंबाखू विक्रीचा व्यवसाय चालवला आहे.काही किराणा दुकानदार दुकान तपासणी केली जात असल्याने गोडाऊन वा राहत्या घरी सुगंधित तंबाखूची साठवणूक करून ठेवत असल्याची चर्चा आहे.जिल्ह्यात तंबाखू विक्रीला बंदी असतांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असून याकडे कां बरं दुर्लक्ष केले जाते आहे.तंबाखूच्या आहारी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सेवन करण्याचे प्रमाण वाढल्याने घसा दुखणे,दंत कीड,पोट दुखी, पोटात गोळा तयार होणे व इतर असे अनेक आजार होण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.यामुळे तंबाखू विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील किराणा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.