Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकारमध्ये सापडली तीन कोटींची रक्कम; पण दाखवली अर्धी.. - तब्बल ११ पोलिसांवर...

कारमध्ये सापडली तीन कोटींची रक्कम; पण दाखवली अर्धी.. – तब्बल ११ पोलिसांवर गुन्हे दाखल; पोलिस अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच प्रकरणांमध्ये पोलिसांकडून रक्कम पकडली जाते.मात्र,त्यातील रक्कम अनेकजण हडपतांना दिसून येतात.जसे,सट्टा-पट्टी,अवैध दारू,अवैध तंबाखू विक्री,जुगार व इतर प्रकरणांत काही पोलीस खिशातील पैसे काढून आमभरो-पोटभरो असे करीत असतात.अश्याच प्रकारे ८ ऑक्टोंबर २०२५ रोजीच्या रात्री मध्यप्रदेशातील कटनी येथून एक कार महाराष्ट्रातील जालन्याकडे निघाली होती.सिवनी पोलिसांनी कारचा पाठलाग करून ८ ऑक्टोंबरच्या रात्री उशिरा कारची झडती घेतली असता त्यात ३ कोटी रुपये आढळले होते. पोलिसांनी यातील १ कोटी ४५ लाख ५० हजार रुपये काढून घेतल्याने प्रकरणास वाचा फुटली.घटनेनंतर राज्यासह देशात खळबळ उडाली होती.प्राथमिक तपासानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सूचनेनुसार पोलिस महानिरीक्षकांनी या लुटीत सहभागी असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ)पूजा पांडेंसह ११ पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले.त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा पांडे यांच्यासह सहा पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.त्यातच सिवनीचे सध्याचे पोलिस अधीक्षक सुनील मेहता आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपक मिश्रा यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.तर,सहा आरोपी फरार आहेत.मध्य प्रदेशातील सिवनी येथे झालेल्या या लुटीच्या प्रकाराने पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असून संपूर्ण पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.प्रकरणी सिवनी पोलिसांनी एसडीओपी पूजा पांडेसह सहा पोलिस कर्मचाऱ्यांना अटक केली आहे आणि फरार कर्मचाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!