- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
छत्रपती संभाजीनगर :-राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफ थंडावल्यानंतर काल,सोमवारच्या रात्री मत खरेदी करणारे रॅकेट उघडकीस आले आहे.विधानसभा निवडणुकीच्या एका मतासाठी उमेदवारांकडून मतदारांना दीड हजार रुपये दिले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.दोघेजण एक हजार देऊन आधार कार्ड आणि मतदान कार्ड जमा करून घेत होते.मतदानाच्या दिवशी ५०० रुपये घ्यायचे आणि मतदान करायचे.हा प्रकार इंदिरानगर येथे काल,सोमवारी १८ नोव्हेंबर रोजीच्या रात्री ८.३० वाजता समोर आला असून जवाहरनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी अशोक रामभाऊ वाकोडे वय ४२ वर्षे, रा.शंभूनगर हा पैसे देतांना,तर नदीम पठाण रा. इंदिरानगर हा पैसे घेतांना पकडण्यात आला.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर मतदारसंघात पैसे वाटप सुरू झाले आहे.पश्चिम मतदारसंघातील इंदिरानगर भागात दोन जणांना पैसे
वाटप करतांना जवाहरनगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एका नागरिकाने परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त नवनीत काँवत यांच्याकडे पैसे वाटपाचा व्हिडिओ पाठवला होता. तोच व्हिडिओ काँवत यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेरमाळे यांना पाठवला. त्यानंतर शेरमाळे यांची टीम तातडीने इंदिरानगर येथे रात्री ८.३० वाजता दाखल झाली.त्या वेळी अशोक वाकोडे हा नदीम पठाण याला एक हजार देत होता आणि त्या बदल्यात नदीमकडून त्याचे आधार,मतदान कार्ड जमा करून घेत होता.त्यानंतर मतदानाच्या दिवशी ५०० रुपये घ्यायचे अन् आधार कार्ड-मतदान कार्ड घेऊन जायचे व मतदान करायचे वाकोडे सांगत होता.वाकोडेला हे काम करण्यासाठी जावेदने सांगितले होते.जावेद वाकोडेला एका मताच्या पाठीमागे २०० रुपये देत होता; असे पोलिसांच्या तपासात समोर आले.याप्रकरणी एफएसटी
पथकाचे सागर गोरे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर
रात्री उशिरापर्यंत जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखलची प्रक्रिया सुरू होती.
- Advertisement -