उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- जिल्ह्यातील मुंडीपार(खुर्द) येथील पांगोली नदीमध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज २९ जुलै २०२३ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.दोन्ही मुले गावा नजीकच्या शेतशिवरात शेळ्या चराई करीता गेले होते.शेतशिवारा जवळच पांगोली नदीपात्र लागून आहे.शेळ्या चराई करता-करता नदी पात्रा जवळून एकाचा पाय चीखलात घसरला; चिखलात पाय घसरल्याने तो नदीमध्ये पडला.त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या मुलाने प्रयत्न केले.मात्र नदीमध्ये खोलवर पाणी असल्याने दुसराही पाण्यात बुडाला व दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.सदर मुलांचे नाव गंगाधर भिवाजी भरणे वय १४ वर्षे व आर्यन शालिकराम सहारे वय १२ वर्षे असून नदीपात्रा जवळून जातांना आर्यनचा पाय चिखलात घसरला व नदीपात्रात कोसळला; त्याला वाचविण्याचे प्रयत्न गंगाधर ने केले होते.मात्र सदरचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने दोन्ही मुलांचा करून अंत झाला.आर्यन आठवीत तर गंगाधर नववीत शिकत होता.सदर घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलीसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.