Thursday, September 24, 2026
Homeनाशिकउमेदवारांसाठी विमानाने ‘एबी फॉर्म’ पाठवणे भोवणार... - निवडणूक आयोगाने दखल घेत दिले...

उमेदवारांसाठी विमानाने ‘एबी फॉर्म’ पाठवणे भोवणार… – निवडणूक आयोगाने दखल घेत दिले चौकशीचे आदेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नाशिक :-नाशिक जिल्ह्यातील विधानसभेच्या तीन जागांसाठी खास विमानाने नेण्यात आलेल्या ‘एबी फॉर्म’ ची वार्ता सर्वदूर पसरल्यानंतर निवडणूक आयोगानेही त्याची दखल घेतली आहे.या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आयोगाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमकडे विचारणा केल्याची प्राथमिक माहिती आहे.विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून,जिल्ह्यात पक्षांतर्गत बंडखोरीसह मैत्रीपूर्ण लढतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या अर्ध्या तासात ‘एबी फॉर्म’ बाबत नाट्यमय घडामोडी घडल्या.देवळाली आणि दिंडोरीतील प्रत्येकी एका उमेदवारासाठी खास विमानाने ‘एबी फॉर्म’ पाठविण्यात आले.अंतिम काही मिनिटांत ते दाखल झाल्याने उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. या धावपळीमध्ये इगतपुरीसाठीही एक ‘एबी फॉर्म’ दहा मिनिटे उशिराने आल्याने तो दाखल होऊ शकला नाही.याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याची दखल घेऊन जिल्हा निवडणूक शाखेला त्याबाबत विचारणा केली आहे. अर्ज देण्यासाठी विमान कोणी आणले,त्यामध्ये कोण होते,कोणत्या उमेदवारांकरिता हे फॉर्म मागविण्यात आले व त्यासाठी किती खर्च आला,अशी विचारणा स्थानिक प्रशासनाकडे झाल्याचे समजते.जिल्हा प्रशासनाने या चौकशीला सुरुवात केली असून,एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाकडे त्याबाबत विचारणा केली आहे.याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.विमान प्रवासाचा खर्च उमेदवारांच्या फॉर्मसाठी झाल्याचे स्पष्ट झाले, तर त्याचा खर्च उमेदवाराच्या खात्यात टाकला जाईल.अन्यथा हा खर्च पक्षाच्या खात्यामध्ये टाकला जाऊ शकतो.पक्षाच्या खर्चाला मर्यादा नाहीत.मात्र,हा खर्च उमेदवाराच्या खात्यात पडल्यास स्वतंत्र विमान आणल्याचा खर्च मोठा असणार आहे.त्यामुळे संबंधित उमेदवारांच्या पुढील खर्चाबाबत मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!