Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोली'उपजीविका विकास' प्रकल्पाला हातभार; दुर्गम भागातील १ हजार ५०० कुटुंबांना मिळणार शाश्वत...

‘उपजीविका विकास’ प्रकल्पाला हातभार; दुर्गम भागातील १ हजार ५०० कुटुंबांना मिळणार शाश्वत आधार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील एटापल्ली तालुक्यात महत्त्वाकांक्षी ‘एकात्मिक उपजीविका विकास’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.बायफ(BAIF)डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला हा प्रकल्प एसबीआय फाउंडेशनने पुरस्कृत केला आहे.१ एप्रिल २०२५ पासून ३ वर्षांसाठी सुरू झालेल्या या प्रकल्पासाठी ₹४.९५ कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे.एटापल्ली तालुक्यातील २० गावांना लक्ष्य करून,सुमारे १ हजार ५०० कुटुंबांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचे मुख्य उद्दिष्ट या प्रकल्पाचे आहे.हवामान-अनुकूल शेतीला प्रोत्साहन देणे,उपजीविका सुधारणे आणि निवडक गावांमधील समुदायाची समृद्धी वाढवणे,हे या उपक्रमाचे मूळ केंद्र आहे.या प्रकल्पात चालू वर्षासाठी ५०० कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली आहे.यासोबतच, जलसंधारण वाढवण्यासाठी १५ बोडींमधील(नैसर्गिक शेततळी) गाळ काढण्याचे कामही यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.या प्रकल्पात ‘नैसर्गिक शेततळी-आधारित शेती प्रणाली’ या अभिनव संकल्पनेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.ही प्रणाली एकात्मिक दृष्टिकोन वापरते,जिथे शेततळीत मासेपालन केले जाते,शेततळ्याच्या वर कुक्कुटपालन करून कोंबड्यांचे खत माशांसाठी नैसर्गिक खाद्य म्हणून वापरले जाते आणि त्याच पाण्याचा उपयोग नजीकच्या पिकांना सिंचनासाठी केला जातो.हा मॉडेल पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करतो आणि कृषी उत्पादकता वाढवून ग्रामीण कुटुंबांसाठी उत्पन्नाचे अनेक स्रोत उपलब्ध करतो. २०२७-२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर,१ हजार ५०० कुटुंबांना शाश्वत आर्थिक आधार मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!