Monday, September 21, 2026
Homeसोलापूरउद्या दहावीचा पेपर अन् आजच स्ट्राँग रूममधून प्रश्नपत्रिका गेल्या चोरीला..

उद्या दहावीचा पेपर अन् आजच स्ट्राँग रूममधून प्रश्नपत्रिका गेल्या चोरीला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
सोलापूर :-जिल्ह्याच्या सांगोला शहरातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.उद्या,१८ मार्च रोजी होणाऱ्या दहावी बोर्डाच्या भूगोल विषयाच्या पेपरच्या तब्बल ५० प्रश्नपत्रिकांचा एक संच आज,मंगळवार १७ मार्च रोजी सांगोला शहराच्या सांगोला विद्यामंदिर या परीक्षा केंद्रातील स्ट्राँग रूममधून चोरीला गेल्याचे उघडकीस आल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.सदरची चोरी ही आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली.अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून प्रश्नपत्रिकांचा संच लंपास केले.
सध्या राज्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत.उद्या, बुधवारी १८ मार्च रोजी भूगोल विषयाचा पेपर आहे. अश्यातच आज शिक्षण विभाग व कस्टोडियन हे काल सोमवारचे उरलेले पेपर पोस्टाच्या माध्यमातून बोर्डाला पाठवण्यासाठी गेले असता,त्यांना स्ट्राँग रूमचे कुलूप तोडल्याचे दिसून आले.त्यावेळेस सदरची चोरी निदर्शनास आली.धक्कादायक बाब म्हणजे, स्ट्राँग रूम समोरील सीसीटीव्ही बंद असल्याने चोरीचे कोणतेही फुटेज उपलब्ध नाही.भूगोल विषयाचा पेपर चोरीला गेल्याची माहिती मिळताच सोलापूरचे एसपी  प्रीतम कुमार यावलकर,डीवायएसपी बसवराज शिवपुजे व स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर,जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख,शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी चर्चा केली.त्यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेऊन शिक्षण विभागाला योग्य त्या सूचना केल्या.त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलिस अधीक्षकांशीही संवाद साधून या प्रकरणी चर्चा केली.सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे यापूर्वी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.हे विशेष.स्ट्राँग रूमसारख्या ठिकाणी प्रश्नपत्रिका चोरीला जाणे म्हणजे सुरक्षा व्यवस्था किती कार्यतत्पर म्हणावे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.पेपर फुटीमुळे नवीन पेपर निघणार की काय? शिक्षण विभाग काय भूमिका घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!