Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोलीउद्याला पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन.. -विविध नामांकित कंपन्या उमेदवारांच्या भरतीसाठी...

उद्याला पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन.. -विविध नामांकित कंपन्या उमेदवारांच्या भरतीसाठी राहणार उपस्थित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)गडचिरोली आणि जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.सदरचा रोजगार मेळावा उद्या,बुधवार ८ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गडचिरोली येथे पार पडणार आहे.या ठिकाणी विविध नामांकित कंपन्या उमेदवारांच्या भरतीसाठी उपस्थित राहणार असून,पात्र उमेदवारांना रोजगार मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक ०७१३२-२२२३६८ वर संपर्क साधावा. या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, आधारकार्ड तसेच शैक्षणिक पात्रतेची छायाप्रती (झेरॉक्स)सोबत घेऊन स्वखर्चाने उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी न गमावता उपस्थित राहून रोजगार संधींचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!