Wednesday, May 13, 2026
Homeगडचिरोलीउद्यापासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू; विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज.. - सर्व विद्यार्थ्यांना...

उद्यापासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू; विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज.. – सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके,गणवेश,बुट व मोजे शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार वितरीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उद्या,सोमवार २३ जून २०२५ पासून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरू होत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये भव्य प्रवेशोत्सव साजरा होणार असून,सर्व नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत अत्यंत उत्साहात करण्यात येणार आहे.सदर प्रवेशोत्सव कार्यक्रम सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल तसेच खासदार,आमदार आणि सनदी अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमध्ये स्वागतासाठी सज्जता करण्यात आली आहे.शिक्षण विभागातर्फे २१ व २२ जून रोजी शाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून प्रवेशोत्सवासाठी सजावट, फुगे व फुलांनी शाळेची आकर्षक रचना,विद्यार्थ्यांचे स्वागत,सांस्कृतिक कार्यक्रम,पालक शिक्षक संवाद आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश,बुट व मोजे शाळेच्या पहिल्याच दिवशी वितरीत करण्याचे निर्देश गाडे यांनी दिले आहेत.नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण करणे, शिक्षणाविषयी सकारात्मकता वाढवणे आणि शाळेची ओळख करून देणे,हे या प्रवेशोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठीही विशेष नियोजन करण्यात आले असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुक्यात होणार ४८ हजार लिटर केरोसीनचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून उद्भवणाऱ्या संभाव्य जोखमीचे निराकरण करण्यासाठी स्वयंप्रकाशासाठी व दिवाबत्तीसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीनचे तालुकानिहाय वाटप करण्याचा निर्णय...

नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात  'फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार' वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.या सोहळ्यात...

चक्क वाळू डेपोच्या सावंगी रेतीघाटात अवैध वाळू उपश्याचा खेळ..! – देसाईगंज महसूल अन् पोलीस विभाग निद्रावस्थेत; आम्ही सांगणार तेव्हाच डोळे उघडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात हल्ली रेती उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पुढील महिन्यापासून लिलाव झालेल्या सर्व रेती घाटांचा ताबा तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात येणार...

उपराजधानीत मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीची(हनुमान)विराट आणि भव्य-दिव्य अशी मूर्ती तयार करण्यात येत असून नागपूरच्या कोराडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!