Thursday, June 25, 2026
Homeगडचिरोलीई-पॉस प्रणालीतून खत विक्री अनिवार्य; साठ्यात तफावत आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई..

ई-पॉस प्रणालीतून खत विक्री अनिवार्य; साठ्यात तफावत आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील सर्व रासायनिक खत विक्रेत्यांना अनुदानित खत विक्रीसाठी ई-पॉस (e-PoS) प्रणालीचा वापर अनिवार्य करण्यात आला असून, प्रणालीतील नोंदी आणि प्रत्यक्ष गोडावूनमधील साठा यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाईच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. अनुदानित खत विक्री ही केवळ ई-पॉस प्रणालीद्वारेच करण्याची सक्ती असून,विक्रीची नोंद iFMS प्रणालीमध्ये त्वरित आणि अचूक व्हावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरील खत निरीक्षकांना नियमित तपासणीसाठी निर्देश देण्यात आले आहेत.
ई-पॉस प्रणालीत दाखवलेला साठा आणि प्रत्यक्ष गोदामातील साठा यात कोणतीही तफावत आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.अशा विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येऊन त्यांच्या परवाना नूतनीकरणास प्रतिबंध करण्यात येईल.
L१ सुरक्षा असलेल्या नवीन e-PoS मशीनबाबत अंतिम मुदत १० ऑगस्ट :- जे विक्रेते अद्याप L१ सुरक्षा मानक असलेली ई-पॉस मशीन वापरत नाहीत, त्यांनी जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून १० ऑगस्ट २०२५ पूर्वी मशीनचे अद्ययावत करून घेण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!