Wednesday, September 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तई-केवायसी करा अन्यथा दीड हजार रुपये विसरा..! लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची शेवटची...

ई-केवायसी करा अन्यथा दीड हजार रुपये विसरा..! लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची शेवटची तारीख जाहीर.. – दिलेल्या लिंक वरून करा ई-केवायसी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आता दरवर्षी जून महिन्यात ईकेवायसी करावी लागणार आहे.सध्या स्थितीत ई-केवायसी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केल्याने पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी केल्याशिवाय पर्याय नाही; अन्यथा लाभ बंद केला जाईल.अश्यातच आता ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.या तारखेच्या आत पात्र लाभार्थी महिलांना ईकेवायसी पूर्ण करावी लागणार आहे.याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या ‘एक्स म्हणजेच ट्विटर अकाऊंटवर माहिती देत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभमिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली.दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध आहे.यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते.” मंत्री तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,पुढील महिन्याच्या १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी लिंक👇
वरील लिंक वर क्लिक करून मुखपृष्ठावर असलेल्या
ई-केवायसी(e-KYC)बॅनरवर क्लिक करा,क्लिक केल्यावर ई-केवायसी फॉर्म उघडेल.या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि खाली दिलेला कॅप्चा कोड टाकावा,त्यानंतर खालील सूचना वाचून ओके बटनावर क्लिक करावे,
त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी(OTP)येईल.हा ओटीपी
टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच कॅप्चा कोड टाकावा,संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे.OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागतीलः
१.माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
२.माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
३. शेवटी, “Success-तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!