उद्रेक न्युज वृत्त
औरंगाबाद :- इंदुरिकर महाराज नेहमीच आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक,राजकीय व इतर बाबींवर छाप पडण्याचा प्रयत्न करीत असतात. काही कीर्तने समाज प्रबोधनाची असतात व त्यातून अनेकांच्या मनात रुजत सुध्दा असतात.मात्र एका कार्यक्रमा प्रसंगी इंदुरिकर महाराजांनी लिंगभेदावर भाष्य केल्याने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती.इंदुरिकर महाराजांनी सम आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा आणि मुलगी होत असल्याचे एका कीर्तनात म्हटले होते.त्यानुसार इंदुरिकर महाराजांवर न्यायालयाची टांगती तलवार आली आहे.यावर आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने मोठा निर्णय दिला.न्यायालयाने इंदुरिकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा; असे आदेश न्यायालयाने दिल्याने इंदुरिकर महाराजांच्या अडचणीत वाढ होणार आहे.