Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीइंग्लंडच्या विद्यापीठात गडचिरोलीच्या 'लेडी टॅक्सी चालक' तरुणीला मिळाला प्रवेश...- २७ लाख रुपयांसाठी करतेय...

इंग्लंडच्या विद्यापीठात गडचिरोलीच्या ‘लेडी टॅक्सी चालक’ तरुणीला मिळाला प्रवेश…- २७ लाख रुपयांसाठी करतेय धडपड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली: गडचिरोली सारख्या आदिवासी आणि नक्षली विभागात राहून घरी आठराविश्व दारिद्रय म्हणून तिने टॅक्सीचे स्टेअरिंग हातात घेतले अन् टॅक्सी चालवून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला सुरुवात केली.गडचिरोलीतील लेडी टॅक्सी चालक म्हणून ती फेमसही झाली.पण हे करताना शिक्षण मात्र सोडले नाही.ती शिकत राहिली.परीक्षा देत राहिली अन् अखेर तिला सातासमुद्रापलिकडचे दरवाजे उघडे झाले.ही कहाणी आहे गडचिरोलीची लेडी टॅक्सीचालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किरण रमेश कुर्मा हिची आणि तिच्या जिद्दीची.किरणला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या प्रसिद्ध ‘लीड्स’ विद्यापीठात प्रवेश मिळाला असून तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

किरण रमेश कुर्मा वय २५ वर्षे ही तरुणी सिरोंचा तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या रेगुंठा येथे राहते.तिने अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे.‘लेडी टॅक्सी चालक’ म्हणून गडचिरोलीत प्रसिद्ध आहे.वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून उदरनिर्वाहासाठी ती टॅक्सी चालवते.महिलांनी चार चाकी वाहन चालविणे हा आता कौतुकाचा विषय राहिलेला नाही.परंतु अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन एखादी युवती नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात चक्क टॅक्सी चालवते तेव्हा ती कौतुकाचीच नाही तर आश्चर्याचा सुखद धक्का देणारी बाब ठरते.किरणचा ध्यास आणि कष्टाचे सर्वत्र कौतुक याआधीच झाले आहे.राज्याबाहेरही तीला विविध पुरस्काराने गौरव करण्यात आले आहे. 

हलाखीच्या परिस्थितीतही उच्च शिक्षण घेण्याच्या जिद्दीमुळे तिला आज विदेशात शिक्षण घ्यायची संधी चालून आली आहे.टॅक्सी चालवून उत्पन्न बऱ्यापैकी होत होते.परंतु किरणला उच्च शिक्षणाची दारे खुणावत होती.उच्च शिक्षण घेतले पाहिजे असे तिला मनातून वाटत होते.म्हणून तिने उच्च शिक्षणासाठी काय करावे लागेल याचा शोध घेण्यास सुरुवात केली.याच काळात बीड येथील एकलव्यच्या कार्यशाळेत राजू केंद्रे आणि विशाल ठाकरे यांच्याशी तिची ओळख झाली.या दोघांनीही तिला परदेशी शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले.या दोघांचे मार्गदर्शन मिळाल्याने किरणने विदेशातील काही विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न चालू केले.सप्टेंबर २०२२ मध्ये तिने इतर विद्यापीठांच्या प्रवेशपूर्व परीक्षा दिल्या. यात तिला यश मिळाले.जगात ८६ वे मानांकन असलेल्या इंग्लंडमधील ‘लीड्स’ विद्यापीठात एमएससी ‘मार्केटिंग मॅनेजमेंट’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला.अन् तिची धडपड थांबली.किरणला लीड्स विद्यापीठात प्रवेश मिळाला असला तरी तिच्या समोरील अडचणींचा डोंगर अजून संपलेला नाही.विद्यापीठात २७ लाख रुपये शुल्क भरायचे आहे.एवढी रक्कम भरायची कुठून? असा प्रश्न पडला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!