उद्रेक न्युज वृत्त :- तंत्रज्ञानाच्या युगात आपली जीवन शैलीही बदलत चालली आहे.सर्वांना ऑनलाईनची वेड लागलेली दिसते.याचेच खरे उदाहरण म्हणजे ज्यावेळेस घरातील भांडी साफ करण्याकरिता कुठल्याही प्रकारचे साबण वा पावडर नसायचे; त्यावेळेस आपले पूर्वज भांडी साफ करण्याकरिता कोंड्याची वा चुलितील राखड वापरायचे.मात्र हल्ली आपण भांडी घासण्याची साबण वापरतो.अशातच ऑनलाईन कंपन्या नवनवीन फंडे वापरून आपण वापरीत असलेल्या पूर्वीच्याच वस्तू परत आपणांस महागड्या किंमतीत विकतांना दिसून येत आहेत.

फुकट आपल्या घरी उपलब्ध असलेली लाकडाची राखड Amazon च्या ऑनलाईनवर १ हजार ८०० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे.पूर्वी जी वस्तू आपल्याला मोफत मिळत होती; ती आज ऑनलाईनच्या माध्मातून ॲश पावडरच्या नावाने विकली जात आहे.अशाच प्रकारे गायीचे शेण पॅक करून ४५० रूपये,च्यु स्टिक्स म्हणजे दातून १०० ते १५० रुपयांना ऑनलाइन विकले जात आहे. यावरून लक्षात येते की,पूर्वी आपण ज्या वस्तूंना फुकट व गरजेची म्हणून वापरायचे तीच वस्तू दुसऱ्या मार्गाने आपणाकडे परत येत आहे.