उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- आणखी कित्तेक दिवस जुनी पेन्शनचे संप सुरू राहणार; कळेनासे झाले असल्याने गाठ सरकारशी मात्र हाल अपेष्टा सर्वसामान्य जनतेची अशी अवस्था निर्माण झाली आहे.
रुग्णांना वेठीस धरत जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकार विरोधात भांडत असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर बहिष्कार टाकल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे.अत्यावश्यक सेवेतील ९५ टक्के मनुष्यबळ संपावर असल्याने सार्वजनिक आरोग्याचा खेळखंडोबा झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून वॉर्डात दाखल असलेल्या रुग्णाच्या खाटेवरील चादर बदलायला देखील माणूस उपलब्ध नाही.त्यामुळे आजार बरा होण्या ऐवजी नव्या जंतुसंर्गाची जोखीम वाढत चालली आहे.
संप जस जसा चिघळत आहे,तस तशी रुग्णांची आणि नातेवाईकांची सहनशिलता देखील संपत चालली आहे.संपाच्या नावाखाली परिचारिकांनी पूर्णतः कर्तव्यातून पळ काढल्याने भरती असलेल्या रुग्णांना इंजक्शन लावण्यापासून ते सलाईन बदलण्यापर्यंत सगळी कामे निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना करावी लागत आहेत.त्यामुळे डॉक्टरांवरील कामाचा ताण वाढल्याने रुग्णांचे नातावाईक आणि डॉक्टरांमध्ये वादावादीचे प्रकार सुरू झाले आहेत.
मेडिकल-मेयो घेणार बाह्यस्त्रोतांची मदत
मेडिकलमधील ९५०,मेयोतील ४०० परिचारिकांनी संपात उडी घेतली आहे.तर मेडिकलमधील ३५० आणि मेयोतील २०० चतुर्थश्रेणी कर्मचारीही संपात सहभागी आहेत.त्यामुळे संपूर्ण मेडिकलचा डोलारा सध्या १६५ खासगी कंत्राटी परिचारिका आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या २५० भावी डॉक्टरांच्या खांद्यावर येऊन पडला आहे.त्यामुळे मेडिकल शनिवारापासून आणखी १०० जणाची बाह्यस्त्रोतामार्फत नियुक्ती करून मदत घेणार आहे.