Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीआरमोरी विधानसभा मतदान पथकातील १६०० कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न..

आरमोरी विधानसभा मतदान पथकातील १६०० कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाद्वारा जाहीर महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.त्यानुसार आरमोरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी (भा.प्र.से.)यांचे मार्गदर्शनात आरमोरी विधानसभा मतदार संघामधील मतदान पथकांकातील एकूण १६०० अधिकारी व कर्मचारी यांचेकरिता Theory व EVM/VVPAT Hands On पहिल्या प्रशिक्षणाचे आयोजन २६ ऑक्टोंबर व २७ ऑक्टोंबर रोजी सांस्कृतिक भवन नगर परिषद देसाईगंज येथे करण्यात आले होते.सदर प्रशिक्षणामध्ये मतदान पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडावयाच्या  कामगिरीबाबत रणजीत यादव
(भा.प्र.से.)उपविभागीय अधिकारी कुरखेडा,श्रीमती प्रिती डूडूलकर तहसीलदार देसाईगंज,श्रीमती उषा चौधरी तहसीलदार आरमोरी यांचे द्वारा प्रशिक्षणाचे माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.ग्राम महसूल अधिकारी यांचे द्वारा EVM/VVPAT Hands On चे प्रशिक्षण देण्यात आले.यामध्ये मतदान पथकातील उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी EVM/VVPAT ची प्रत्यक्ष हाताळणी केली.व त्यांचेकडून मतदान यंत्र हाताळणी व सिलिंग प्रक्रियाबाबत तसेच मतदानाचे दिवशी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरिता कोणतीही अडचण येणार नाही; असे प्रमाणपत्र घेण्यात आले.याकामी ६७-आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील ३४ क्षेत्रीय अधिकारी यांनी सहकार्य केले.
प्रशिक्षणादरम्यान मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे द्वारा विचारण्यात आलेल्या शंकांचे निराकरण वेळीच करण्यात आले.मतदान पथकांचे हजेरी पत्रकावर स्वाक्षरी व फार्म नं.१२ (Postal Ballot) व फार्म नं.१२ A (EDC) भरून घेणेकरीता एकूण १६ टेबल ची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मतदान पथकातील अधिकारी / कर्मचारी यांना मतदार यादितील नाव शोधण्याकरिता मतदान कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!