Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीआरमोरी येथे रेशीम दिन कार्यक्रम उत्साहात साजरा..

आरमोरी येथे रेशीम दिन कार्यक्रम उत्साहात साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाच्या वतीने १ सप्टेंबर हा राज्य रेशीम दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने जिल्हा रेशीम कार्यालय,आरमोरी येथे रेशीम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त,जिल्हा मत्स्य विभाग डोंगरे,वैज्ञानिक डी.बी.एस.एम.टी.सी.भंडारा येथील  गेडाम,स्वयंसेवी संस्थेचे संचालक चव्हाण तसेच जिल्हा रेशीम विकास अधिकारी वासनिक उपस्थित होते.तसेच जिल्ह्यातील टसर व तुती रेशीम उत्पादक शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमामध्ये टसर व तुती रेशीम उत्पादनासंबंधी अद्ययावत तंत्रज्ञान,शासनाच्या विविध योजना व त्यांचा लाभ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच कोष बाजारपेठ,R.M.B.कोष खरेदी,वनक्षेत्रातील अडचणी, कोष धागाकरण इत्यादी मुद्द्यांवर उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा घेण्यात आली.शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडत अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी मागील हंगामात अधिक उत्पादन घेणाऱ्या आदर्श रेशीम शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच मत्स्य विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक उईके यांनी केले तर आभार प्रदर्शन क्षेत्र सहाय्यक विठ्ठले यांनी केले.रेशीम उद्योगाच्या प्रोत्साहनासाठी तसेच शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.रेशीम उद्योगाशी संबंधित अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय,देसाईगंज (वडसा रोड)आरमोरी,जि.गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!