Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीआरमोरी,चामोर्शी तालुक्यात हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम...- १० फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी...

आरमोरी,चामोर्शी तालुक्यात हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम…- १० फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येणार मोहीम….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त                             

गडचिरोली :- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोगाचे दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिम गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व चामोर्शी तालुक्यात १० फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेअंतर्गत राज्यातील हत्तीरोगासाठी संवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्हयात डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळया सोबतच आयव्हरमेक्टीनची तिसरी मात्रा गरोदर माता ५ वर्षा खालील बालके व गंभिर आजारी रुग्ण वगळून देण्यात येणार आहे.वरील औषधांचे सेवन केल्याने हत्तीरोगाचे जंतू नष्ट होतात.ही औषधी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष खाणे आवश्यक आहे.

जिल्हयात हिवताप खालोखाल हत्तीरोगही महत्वाची सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे.या रोगामुळे रोग्यास अपंगत्व येऊन आर्थिक उत्पन्न यावरही परिणाम होतो.विदृपता व अपंगात्वामुळे रुग्णांना लोकांमध्ये मिसळणे त्रासदायक होते.

हत्तीरोगाचा प्रसार

हत्तीरोग ( हत्तीपाय) हा एक सुतासारखा (मायक्रोफायलेरिया) कृमीमुळे होणारा रोग असून याचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. याडासाची पैदास उघडी गटारे,डबकी,घाण पाण्यात होते.क्युलेक्स डासाची मादी मनुष्याला चावल्यामुळे हत्तीरोगाच्या कृमीचा शरीरात प्रवेश होऊन ८ ते १८ महिन्याच्या कालावधीत पुढील लक्षणे दिसून येतात. लोकांना बाहृय दृष्टीने बरे वाटत असले तरी त्यांचे शरीरात हत्तीरोगाचे परजीवी जंतू असू शकतात.

लसिका ग्रंथिचा हत्तीरोग

लसिकाग्रंथी,लसिका वाहिण्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास किंवा ईजा झाल्यास त्यातील लसिचा द्रव अवयवामधून निट वाहू शकत नाही व तो शरीराच्या विशिष्ट भागामध्ये साचतो.(हात व पाय ) हा अडथळा हत्तीरोगाच्या जंतूमुळे झाला असेल तर त्यास लसिकाग्रंथी,लसिकेचा हत्तीरोग असे म्हणतात.यात शरीरातील विविध अवयावांवर लसिका द्रव साचल्यामुळे सूज येते उदा.वक्षस्थळे,पुरुष व स्त्रीचे गुप्त अवयव,हात,पाय,जसजसा कालावधी वाढत जातो तसतसी विदृपता वाढत जाऊन रुग्णाला शारीरीक त्रास सहन करावा लागतो.गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी,आरमोरी तालुक्यातील 

अंडवृध्दी व हत्तीपाय रुग्ण पुढील प्रमाणे 

चामोर्शी तालुका-अंडवृध्दी रुग्ण- १४२ व हत्तीपाय रुग्ण -९७२, आरमोरी तालुका:- अंडवृध्दी रुग्ण-६० हत्तीपाय रुग्ण – ८५१  आहेत.असे जिल्हा हिवताप अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!