Tuesday, May 26, 2026
Homeगडचिरोलीआमदार डॉ.होळी यांना तिकिट न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीसारखाच भाजपला पराभवाचा सामना करावा...

आमदार डॉ.होळी यांना तिकिट न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीसारखाच भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल… – उमेदवारीचा फेरविचार न केल्यास भाजपाचे शेकडो पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळावी; यासाठी अनेकजण प्रयत्न करतांना दिसून येतात. अशातच काहींना पक्षाकडून तिकीट मिळाली तर काहींना तिकीट न मिळाल्याने ‘कही खुशी,कही गम’ असा सुर उमटू लागला आहे.त्यातच गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांचे तिकिट भारतीय जनता पक्षाने
कापून डॉ.मिलिंद नरोटे यांना उमेदवारी दिल्याने होळी समर्थक भाजप पदाधिकारी संतापले आहेत.आज, रविवारी गडचिरोली येथे अनेक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन नरोटेंची उमेदवारी न बदलल्यास सामूहिक राजीनामा देऊ; असा इशारा दिला आहे.
डॉ.देवराव होळी यांच्या समर्थकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांनी १० वर्षांच्या कार्यकाळात विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामे केली.कोटगल बॅरेज,वैद्यकीय महाविद्यालय सारखे मोठे प्रकल्प त्यांच्याच कार्यकाळात झाले. मात्र,पक्षातीलच काही जनाधार नसलेल्या नेत्यांनी डॉ.होळी यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करुन त्यांचे तिकिट कापले.डॉ.नरोटे यांना विधानसभा क्षेत्रात फारसे कुणी ओळखत नाही. पक्षातील काही निवडक नेत्यांनी संपूर्ण पक्षालाच वेठीस धरले आहे.डॉ.होळी यांना तिकिट न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीसारखाच भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल,असेही पदाधिकाऱ्यांनी बजावले.
भाजपच्या नेतृत्वाने गडचिरोली विधानसभा क्षेत्रात दिलेल्या उमेदवारीचा फेरविचार न केल्यास शेकडो पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील आणि डॉ. देवराव होळी यांच्या पाठीशी ताकदीनिशी उभे राहतील,असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा सचिव सर्वश्री दिलीप चलाख,साईनाथ बुरांडे,पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर,माजी उपसभापती विलास दशमुखे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य हेमंत बोरकुटे,रामरतन गोहणे, जयराम चलाख,महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्ष प्रतिभा चौधरी, शहराध्यक्ष कविता उरकुडे,भूमिका बारसागडे,स्वाती चंदनखेडे यांच्यासह भाजयुमो,ओबीसी मोर्चाचे अनेक पदाधिकारी,बूथ आणि शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित हो
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकरी कर्जमाफीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार २० मे २०२६ रोजी शेतकरी कर्जमाफीवर मोठे भाष्य करून राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर...

मोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. – पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे "Extremely Severe Alert" म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर...

येत्या सोमवारी होणारी लोकशाही दिन सभा रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात येणार होते.जिल्ह्यातील नागरिकांनी...

दोन चिमुकल्या मुलींवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तात्काळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!