Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीआपसी तडजोड प्रकरणी ११ फेब्रुवारी ला लोक अदालतीचे आयोजन...- वेळ,श्रम व पैस्यांची...

आपसी तडजोड प्रकरणी ११ फेब्रुवारी ला लोक अदालतीचे आयोजन…- वेळ,श्रम व पैस्यांची बचत करण्याकरिता लोक अदालत….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी.शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्यावतीने ११ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली व तालुका न्यायालय अहेरी,आरमोरी,चामोर्शी,देसाईगंज,धानोरा, कुरखेडा व सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे,दिवाणी दावे असे प्रलंबित वाद तसेच वाद दखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत.यासाठी पक्षकार,अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालती मध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत;असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे अध्यक्ष,सचिव व सर्व सदस्य यांनी केले आहे. 

राष्ट्रीय लोक अदालती मध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे १३८ एन.आय.प्रकरणे,भु-संपादन प्रकरणे,कौटुंबिक प्रकरणे,मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे,दरखास्त प्रकरणे,बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन,मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे,पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे,नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे. 

लोकन्यायालयात पारीत झालेल्या प्रकरणांची न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करता येते.लोकन्यायालयात तडजोड केल्याने लोकांचा वेळ,श्रम व पैसा यांची बचत होते.दोन्ही पक्षकारांमध्ये असलेले वैरत्व नष्ट होऊन गोडवा v  चांगले संबंध निर्माण होतात.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई मार्फत संपुर्ण राज्यात ११ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे.तरी सर्वांनी  ११ फेब्रुवारी २०२३ रोजी होणा-या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन तडजोड करून सामंजस्य निर्माण करून सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव आर.आर.पाटील यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!