Tuesday, November 11, 2025
Homeअहेरीआदिवासी विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात कमी पडणार नाही;भाग्यश्रीताई आत्राम -भगवंतराव आश्रम शाळा देवलमरी...

आदिवासी विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात कमी पडणार नाही;भाग्यश्रीताई आत्राम -भगवंतराव आश्रम शाळा देवलमरी येथे स्नेह संमेलन कार्यक्रम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

अहेरी:- आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण दडलेले आहेत.सर्वच क्षेत्रात ते उत्कृष्ट काम करू शकतात हा आत्मविश्वास त्यांच्यात आहे. त्यामुळे ते कुठल्याही क्षेत्रात कमी पडणार नाही असे प्रतिपादन भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरी द्वारा संचालित भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा देवलमरी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील सरपंच लक्ष्मण कन्नाके, प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष येर्रा गावडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बायक्का तुम्मावार, ग्रामपंचायत सदस्य महेश लेकुर तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आश्रम शाळेतून अनेक विद्यार्थी घडले आहेत. त्यांच्यात अभ्यासाची जिद्द होती.त्यामुळे नियमित अभ्यास करा आणि शिक्षणात खंड पडू देऊ नका तुम्हाला पण नक्कीच यश मिळेल असा आत्मविश्वास भाग्यश्रीताई आत्राम यांनी व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद दिला. स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक मुख्याध्यापक शेंडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राथमिक मुख्याध्यापक बी पी संपत तर, संचलन व्ही एम कुळमेथे यांनी केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

व्यवहार न झालेल्या निष्क्रिय बँक खात्यांमध्ये ३९ कोटींपेक्षा जास्त रक्कम पडून.. – ३१ डिसेंबरपर्यंत दावा करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या १० वर्षांपासून व्यवहार न झालेल्या निष्क्रिय बँक खात्यांमधील ठेवी रकमेचा लाभ आता पुन्हा खातेदारांना मिळू शकतो.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार अशा...

देसाईगंज नगराध्यक्ष पदासाठी वनिता नाकतोडेंचे नाव फ्रंट पेजवर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज (गडचिरोली):-नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर होताच अनेकजण मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या...

अल्पवयीन मुलास अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्यास बेड्या..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बऱ्याच कालावधीपासून एका अल्पवयीन मुलास अश्लील(पॉर्न)व्हिडिओ दाखवणाऱ्या ३० वर्षीय इसमास पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.प्रकरणी बाललैंगिक अत्याचार कायदा व पॉक्सो कायद्याच्या...

शेतीसाठी तारेची कुंपण योजना; ८५ टक्क्यापर्यंत अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच रब्बी हंगामातील लागवड क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद कृषी विभागाने “शेतीसाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!