उद्रेक न्युज वृत्त :- रेती घाटांचे रीतसर लिलाव होऊनही कुठल्या ना कुठल्या मार्गे रेती चोरी केली जातेच; यात कुठलीही शंका नाही.त्याचप्रमाणे घाट लिलाव होऊनही सर्वसामान्य जनतेला चढ्या दराने रेतीची विक्री केली जातेय; यासाठी राज्याचे रेती(वाळू) आणि गौण खनिज बाबतचे धोरण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार नागरिकांना एक हजार रुपयात एक ब्रास रेती(वाळू) मिळणार आहे.सदर व्यवसायातील एजंटगिरी थांबवून सरकारच आता लोकांना रेती(वाळू) पुरवठा करणार असल्याने लोकांचा मोठ्या प्रमाणात पैसा वाचणार आहे.नव्या धोरणातून रेती (वाळू)तस्करी पूर्णपणे हद्दपार होणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आता सरकारच करणार नागरिकांना रेतीचा पुरवठा- एजंटगिरीवर लगाम; नागरिकांना एक हजार रुपयात मिळणार एक ब्रास रेती
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES