Wednesday, August 5, 2026
Homeमुंबईआता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार एसटी कर्मचाऱ्यांसाठी २५ खाटांचे रूग्णालय...

आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार एसटी कर्मचाऱ्यांसाठी २५ खाटांचे रूग्णालय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच शासकीय नियमनात आणण्यासंदर्भात आज,मंगळवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी परिवहनचे अपर मुख्य सचिव,संजय सेठी,परिवहन आयुक्त विवेक भीमनवार,एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्यासह प्रवासी वाहतुक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.दरम्यान,याच बैठकीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एसटीच्या जागेवर २५ तर बोरिवलीत एसटी कर्मचाऱ्यांसाठी १०० खाटांचे रूग्णालय उभारणार आहे.
ओला,उबेर,रॅपिडो सारख्या खासगी प्रवासी वाहतूक
करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक  यांनी सांगितले.प्रवासी सुरक्षा,कार पुलींग,लायसन्स, ट्रॅफिक समस्या यासंदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.राज्यातील अनेक बसस्थानके बांधा,वापरा आणि हस्तांतरित करा,या तत्वावर विकसित करण्यात येत आहेत.या एस.टी.च्या प्रकल्पात प्रत्येक जिल्ह्यात २५ तर मुंबईतील बोरिवली येथील जागेवर १०० खाटांचे रूग्णालय एस.टी.कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे.या रूग्णालयात एस.टी.कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येतील,पाच लाखांपर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च राज्यशासन करेल, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.सध्या राज्यभरात विविध ठिकाणी बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर एसटीच्या जागांचा विकास केला जात आहे.भविष्यात या रुग्णालयांमध्ये एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येतील.जेणेकरून त्यांना इतर महाग खाजगी रुग्णालयात जाऊन खर्च करावा लागणार नाही.पुणे,कोल्हापूर,पूसद,वाशिम येथे रुग्णालय उभारण्यासंदर्भातील सादरीकरण यावेळी करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

गडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!