उद्रेक न्युज वृत्त :-पूर्वी गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार केवळ पोलिस उपनिरीक्षक पदापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होते.त्यामुळे पोलीस ठाण्यातील कितीतरी प्रकरणे प्रलंबित राहून अधिकाऱ्यांवरील ताण वाढू लागला होता.अशातच ग्रामीण भागात अपुऱ्या मनुष्यबळाबरोबरच अधिकाऱ्यांची संख्या देखील कमी आहे.अशा परिस्थितीत गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाणही कमी असल्याचे निदर्शनास आल्याने गृहखात्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पोलीस हवालदार म्हणजेच पोलिस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार गृह विभागाने दिले आहेत.त्यानुसार पोलिस वरिष्ठ हवालदारांनाही गुन्ह्याचा तपास करता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने मागील आठवड्यात राजपत्र जारी करत याबाबतची माहिती दिली आहे.मात्र,त्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत.पोलिस हेड कॉन्स्टेबल हा पदवीधर असावा,सात वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी तसेच नाशिक येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात सहा आठवड्याचे विशेष प्रशिक्षण पूर्ण व परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.पोलिस दलातही उच्चशिक्षित तरुण भरती झाल्याने त्यांच्या अनुभवाची दखल घेऊन,त्यांच्याकडे छोट्या गुन्ह्यांचा तपास देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. यामुळे अधिकाऱ्यांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल.
आता पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण होणार कमी.. – पोलीस हवालदारही करणार गुन्ह्यांचा तपास..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

