Friday, July 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता जमीन महसूल संबंधातील प्रकरणात ई-मेलद्वारे नोटीस बजावणे कायदेशीर..

आता जमीन महसूल संबंधातील प्रकरणात ई-मेलद्वारे नोटीस बजावणे कायदेशीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र जमीन महसूलच्या प्रचलित पद्धतीनुसार सुनावणीची नोटीस ही प्रत्यक्ष हस्तपोच किंवा पोस्टाद्वारे पाठवली जायची.यात नोटीस न मिळणे, पत्ता न सापडणे किंवा नोटीस स्वीकारण्यास नकार देणे अशा तांत्रिक कारणांमुळे जमीन महसूल प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडत होती.आता,कलम २३० मध्ये सुधारणा झाल्यामुळे अधिकृत ईमेल आयडीवर पाठवलेली नोटीस ही कायदेशीररीत्या बजावण्यात आली आहे,असे मानले जाईल.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलमांत सुधारणा करून आता पक्षकारांना इलेक्ट्रॉनिक मेल(ई-मेल)द्वारे नोटीस बजावणे कायदेशीर ठरवण्यात आले आहे.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेल्या या प्रस्तावास आज,मंगळवार १० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.विशेष म्हणजे,राज्यात जमिनीशी संबंधित साधारणतः १२ हजार प्रकरणे मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहेत.अनेकदा केवळ नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेतच महिन्यांचा कालावधी जातो.या निर्णयामुळे वेळेची बचत होईल.टपाल किंवा प्रत्यक्ष नोटीस बजावण्याचा वेळ वाचणार आहे.प्रक्रियेत पारदर्शकता येईल.ईमेल पाठवल्याचा तांत्रिक पुरावा उपलब्ध राहत असल्याने ‘नोटीस मिळाली नाही’ ही सबब सांगता येणार नाही.नोटीस वेळेवर पोहोचल्याने सुनावणीच्या तारखा वारंवार पुढे ढकलाव्या लागणार नाहीत,परिणामी सामान्य नागरिकांना जलद न्याय मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!