Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीआता गडचिरोली जिल्ह्यातील मलेरिया निर्मूलनासाठी टीसीआय फाऊंडेशनची विशेष मोहीम..

आता गडचिरोली जिल्ह्यातील मलेरिया निर्मूलनासाठी टीसीआय फाऊंडेशनची विशेष मोहीम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली/मुंबई :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी ग्लोबल फंडने टीसीआय फाऊंडेशनच्या माध्यमातून व्यापक मोहीम हाती घेतली आहे.या प्रकल्पांतर्गत ‘इंटेन्सिफाईड मलेरिया इलिमिनेशन प्रोग्रॅम (IMEP-3)’ राबविला जाणार असून त्यामध्ये रोगनियंत्रणासाठी देखरेख,तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देणे,समाजात जागरूकता वाढविणे तसेच प्रभावी डास नियंत्रण उपाययोजना राबविणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी स्पेशल टास्क फोर्स गठीत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार आहे.मलेरियाचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी परिणामकारक नियोजन,समन्वय आणि अंमलबजावणीद्वारे मलेरिया निर्मूलन शक्य आहे.टास्क फोर्स तसेच टीसीआय फाऊंडेशनचे सहकार्य गडचिरोली जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने गती देईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०३० पर्यंत भारत मलेरियामुक्त करण्याचे ध्येय निश्चित केले असून महाराष्ट्र राज्य हे ध्येय साध्य करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.मलेरियामुक्त महाराष्ट्र हे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य आश्वासक पावले टाकत आहे,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल फंडने सन २०२१-२०२४ (GC6)आणि सन २०२४-२०२७ (GC7) या कालावधीत टीसीआय फाउंडेशनची प्रमुख प्राप्तकर्ता(Principal Recipient)म्हणून निवड केली आहे.देशभरात मलेरिया निर्मूलन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी ही संस्था केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल सेंटर(NCVBDC) सोबत तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!