- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क सुरळीतपणे बजावता यावा याकरिता मतदानाचे दिवशी म्हणजेच येत्या २० नोव्हेंबर आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.
आरमोरी,गडचिरोली व अहेरी विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा; याकरिता शासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी जिह्यातील अनेक गांवामध्ये आठवडी बाजार आहे.नागरीकांच्या जमावामुळे ठिकठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.त्यामुळे जनतेच्या सोयी-सुविधेकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदानाचे दिवशी गडचिरोली जिल्ह्यात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दैने यांनी दिले आहेत.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
- Advertisement -

