Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आरक्षणाचा फैसला..

आज होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आरक्षणाचा फैसला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-जेवढे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना महत्व आहे,तितकेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महत्व आहे.एखादा गावगाडा हाकणे ही मामुली गोष्ट नाही.आमदार किंवा खासदार हे परिसरातील प्रश्न वरच्या लेवलवर मांडत असतात.तर त्या-त्या परिसरातील परिस्थितीचा प्रत्यक्ष सामना हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना करावा लागतो आहे.अश्यातच कुणावर अन्याय होऊ नये,यासाठी काही याचिकाकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.त्यानुसार, आज,मंगळवार २५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद,नगरपरिषद,पंचायत समिती,नगरपंचायत,महानगरपालिका यांच्या निवडणुका संदर्भात आज सर्वोच्च न्यायालय नेमके काय निर्देश देणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात स्पष्टीकरण देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असतांना जिथे ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली जात आहे त्या ठिकाणी ५० टक्के आरक्षण मर्यादेमध्ये ओबीसी आरक्षण कसे दिले जाणार? हे स्पष्ट करावे,अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.त्यामुळे आरक्षणाचा वाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!