Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीआज विविध महसूल मंडळांमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान' शिबिरांचे आयोजन..

आज विविध महसूल मंडळांमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान’ शिबिरांचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विषयक तक्रारी व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी शासनातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत आज,शनिवार १४ मार्च रोजी मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
आज शनिवारी जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांमध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये बाम्हणी (ता.गडचिरोली),पेरमिल्ली(ता.अहेरी), येणापूर(ता.चामोर्शी),देऊळगाव(ता.आरमोरी), मालेवाडा(ता.कुरखेडा),बेळगाव(ता.कोरची), पेंटीपाका(ता.सिरोंचा),ताडगाव (ता.भामरागड), सुरसुंडी(ता.धानोरा) व कोटमी (ता.एटापल्ली)या महसूल मंडळांचा समावेश आहे. त्यानंतरही येत्या,१० एप्रिल,१७ एप्रिल,२४ एप्रिल,८ मे, १५ मे या नियोजित तारखांना महसूल मंडळनिहाय ठिकठिकाणी या शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.
या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह १४ मार्च रोजी आयोजित या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात उपस्थित राहून आपल्या महसुली समस्यांचे निराकरण करून घ्यावे,असेही आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!