Thursday, July 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज राज्यातील तब्बल दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. - बदल्यांचे सुलतान म्हणवणाऱ्यांचीही बदली..

आज राज्यातील तब्बल दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. – बदल्यांचे सुलतान म्हणवणाऱ्यांचीही बदली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या सनदी अधिकाऱ्यांच्या(आयएएस अधिकारी)बदल्यांमध्ये आज, मंगळवार ३१ मार्च रोजी मोठी उलथापालथ झाली आहे. विशेष म्हणजे,प्रशासकीय बाबीतील आजचा दिवस हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असून या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीच तब्बल दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यातील खास बात म्हणजे,बदल्यांचे सुलतान म्हणवणाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे.ते म्हणजे तुकाराम मुंढे.आतापर्यंत त्यांची २१ वर्षाच्या कार्यकाळात तब्बल २५ वेळा बदली झाली आहे.ऑगस्ट २००५ रोजी प्रशिक्षणार्थी म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी पदी नियुक्त झालेले तुकाराम मुंढे हे वविध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त,जिल्हाधिकारी,विक्रीकर सह आयुक्त,सह सचिव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत,सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास,सचिव मराठी भाषा विभाग,असंघटित कामगार विकास आयुक्त पासून ते आज,३१ मार्च रोजी त्यांची मुंबईच्या मंत्रालय विभागातील दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य,महसूल व वन विभाग,मंत्रालय, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.तुकाराम मुंढे हे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.ते त्यांच्या प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहेत.त्यामुळे त्यांना बदल्यांचा सुलतान म्हणतात.मुंढे यांनी दिव्यांगांसाठीच्या योजनांचा लाभ बोगसगिरीने घेणाऱ्यांविरुद्धची मोहीम त्यांनी सुरू केली होती.राज्यातील बोगस दिव्यांगांची झाडाझडती घेण्याचे काम सुरू असतांनाच त्यांची बदली करण्यात आल्याने भल्या लोकांचा जमानाच राहिलेला नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.
  • आज झालेल्या बदल्या👇
१.तुकाराम मुंढे (IAS:RR:२००५): सचिव,दिव्यांग कल्याण विभाग,मंत्रालय,मुंबई यांची सचिव,आपत्ती व्यवस्थापन,पुनर्वसन व मदत कार्य,महसूल व वन विभाग,मंत्रालय,मुंबई येथे बदली.
२.माणिक गुरसल (IAS:SCS:२००९): यांची सचिव,दिव्यांग कल्याण विभाग,मंत्रालय,मुंबई येथे नियुक्ती.
३.अश्विनी भिडे(IAS:RR:१९९५): मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव,यांची मुंबई महानगरपालिका आयुक्त,मुंबई म्हणून नियुक्ती.
४.परिमल सिंह(IAS:RR:२००४): प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प(POCRA), मुंबई,यांची सचिव(कृषी),कृषी व पशुसंवर्धन विभाग, मंत्रालय,मुंबई येथे नियुक्ती.
५.पृथ्वीराज बी.पी. : अतिरिक्त आयुक्त,पुणे महानगरपालिका,पुणे यांची आयुक्त,वसई-विरार महानगरपालिका येथे नियुक्ती.
६.लहू माळी (IAS:SCS:२००९): व्यवस्थापकीय संचालक,शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लि.,मुंबई येथे नियुक्ती.
७.लोकेश चंद्र(IAS:RR:१९९३):अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.,यांची मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव,मुंबई येथे नियुक्ती.
८.विकास चंद्र रस्तोगी (IAS:RR:१९९५): अतिरिक्त मुख्य सचिव(कृषी),कृषी व पशुसंवर्धन विभाग,मंत्रालय,मुंबई,यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा),वित्त विभाग,मंत्रालय,मुंबई येथे नियुक्ती.
९.विनिता वैद्य सिंघल (IAS:RR:१९९६): प्रधान सचिव,आपत्ती व्यवस्थापन,पुनर्वसन व मदत कार्य, महसूल व वन विभाग,मंत्रालय,मुंबई यांची प्रधान सचिव,मृद व जलसंधारण विभाग,मंत्रालय,मुंबई येथे नियुक्ती.
१०.प्रेरणा देशभ्रतार (IAS:RR:२०१०): सह आयुक्त,राज्य कर विभाग,मुंबई यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग,मुंबई येथे नियुक्ती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!