Thursday, August 20, 2026
Homeगडचिरोलीआज राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर..

आज राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार तसेच गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांचा आज,गुरुवार २३ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हा दौरा  असून या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून आढावा बैठक घेणार आहेत.
दौरा कार्यक्रमानुसार,रामटेक येथून गडचिरोलीकडे प्रयाण करून नागपूर-भिवापूर-आसरी मार्गे ते दुपारी साडे बारा वाजता गडचिरोली येथील विश्रामगृहात आगमन करतील.त्यानंतर दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आयोजित बैठकीस ते उपस्थित राहून जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत.सायंकाळी ५:३० वाजता पुन्हा विश्रामगृहात आगमन व राखीव वेळ ठेवण्यात आला असून,रात्री ८ वाजता गडचिरोली येथून रामटेककडे परतीचा प्रवास करणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान राज्य मंत्र्यांना आवश्यक ती सुरक्षा व समन्वय व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.तसेच दौऱ्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना कळविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीत विविध विभागांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेऊन विकासकामांना गती देण्यावर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेतीची वाहतूक; ट्रकसह दोघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या उपविभाग राजुरा पथकाने आज,गुरुवार २० ऑगस्ट रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती वाहतुकीवर मोठी केली.कारवाईत तब्बल ४०...

उद्याला गडचिरोलीत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’; नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उद्या,शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमात विद्यार्थी,युवक, शासकीय...

आश्रमशाळेतील गैरप्रकार प्रकरणी आरोपी शिपायास पोलिस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसोबत कथित गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपावरून आश्रमशाळेच्या नाइट वॉचमनला कोंढाळी...

आता महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-आता महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे.मराठी बोलता येत नसलेल्या चालकांना आज गुरुवारपासून नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!