- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पाऊस तीन ते चार दिवस थांबेल,याची शास्वती कमीच म्हणावी लागेल.जोपर्यंत पूर येणार नाही तो पर्यंत तरी थांबा देईल,असे वाटत नाही.कारण मागच्या कालावधीत पडलेला पाऊस सरळ पूर आल्याबरोबर स्टॉप झाला होता.आता जिल्ह्यासह विदर्भात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे.काल शुक्रवारी जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील देऊळगाव परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.देऊळगाव परिसरात ११८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अश्यातच पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आज, शनिवार २६ जुलै रोजी अद्याप चार मार्ग पुरामुळे बंद असून सतत पाऊस पडत राहिल्यास आणखी मार्ग बंद पडू शकतात.यात
१.सिरोंचा असरअली जगदलपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग-63 (वडधम गावादरम्यान) (हलक्या वाहनाकरिता वाहतूक सुरू आहे.जड वाहतूक बंद) तालुका-सिरोंचा
२.अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग ३७०(वटरा नाला)तालुका-अहेरी
३.कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा-७,तालुका-कुरखेडा
४.तळेगाव पलसगड चारभट्टी रस्ता प्रजिमा-४६ तालुका-कुरखेडा
- Advertisement -

