Saturday, June 13, 2026
Homeगडचिरोलीआजी-आजोबा व नातीची हत्या प्रकरणी चार जण संशयाच्या भोवऱ्यात 

आजी-आजोबा व नातीची हत्या प्रकरणी चार जण संशयाच्या भोवऱ्यात 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- एटापल्ली तालुक्यातील बुर्गी (कांदोळी) पोलिस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या गुंडापुरी येथे बुधवारी अज्ञात इसमांनी आजी-आजोबा व नातीची हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते.या तिहेरी हत्याकांडामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांड प्रकरणी काल,शुक्रवारी पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करीत चार संशयित व्यक्तींना  चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.एटापल्ली तालुक्यातील गुंडापुरी येथील रहिवासी देवू दसरु कुमोटी वय ६० वर्षे त्यांची पत्नी बिच्छे देवु कुमोटी वय ५५ वर्षे तसेच दिवाळीच्या सुट्टीसाठी आजी-आजोबांकडे आलेल्या १० वर्षीय अर्चना तलांडी यांची अज्ञात इसमांनी हातोड्याने वार करीत निर्घृण हत्या केली होती.

गुरूवारी सदर प्रकरण उघडकीस येताच बुर्गी पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला.तिहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी बुर्गी पोलिसांनी तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली असून या अंतर्गत काल,शुक्रवारी मृतकांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांशी चौकशी केली.सदर चौकशीदरम्यान संशय बळावल्याने गावातील चार व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.चौघांचीही सखोल चौकशी केली जात असून लवकरच हत्याकांडतील आरोपींना जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!