गोंदिया :-विविध आजारांना कंटाळून वृद्धाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम खैरलांजी येथील वासुदेव शंकर नेवारे वय ६३ वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव असून ही घटना गुरुवारी पहाटे १:३० वाजता उघडकीस आली.वासुदेव नेवारे यांची दिवाळीच्या पूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यावेळी त्यांची शस्त्रक्रियादेखील झाली.त्यांना मधुमेह,हृदयविकार,किडनी स्टोन व अन्य आजार होते.या आजारांना लागत असलेल्या पैशांमुळे ते त्रस्त होते.बुधवारी रात्री ९ वाजता जेवण करून सर्व कुटुंबीय झोपले असतांना ते घरातून निघून गेले होते.सकाळी ते घरी दिसत नसल्याने घरच्यांनी शोधाशोध केल्यावर त्यांचा मृतदेह घराजवळील विहिरीतच आढळून आला.या घटनेसंदर्भात निरंजन नामदेव नेवारे वय २८ वर्षे, रा.खैरलांजी,ता.तिरोडा यांच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस नाईक मोहन टेंभेकर करीत आहेत.
आजारांना लागत असलेल्या पैशांमुळे त्रस्त वृद्धाने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक