उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना आजपासून म्हणजेच १७ मार्च २०२३ पासून राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये ५०% सवलत राज्याच्या हद्दीपर्यंत लागू करण्यात आली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या साधी, मिडी,मिनी,निमआराम,विनावातानुकुलीत शयन-आसनी,शिवशाही (आसनी),शिवनेरी,शिवशाही(साधी वातानुकूलित) व इतर इत्यादी बसेसमध्ये ५०% पावशी भाड्यामध्ये सवलत देण्यात येणार आहे. सदरची सवलत ही भविष्यात महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस करीताही लागू असणार आहे.५०% सवलत योजना ही ‘महिला सन्मान’ योजना म्हणून गणली जाणार आहे.
सदरची सवलत शहरी वाहतुकीस अनुज्ञेय असणार नाही.तसेच ७५ वर्षावरील महिलांसाठी ‘अमृत जेष्ठ नागरिक’ योजनेच्या परिपत्रकीय सुचनेनुसार १००% सवलत अनुज्ञेय असणार असून ५ ते १२ या वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच ५०% सवलत अनुज्ञेय राहणार आहे.