Friday, October 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआचारसंहितेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नाही- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

आचारसंहितेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नाही- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याने शेतकरी कर्जमाफीबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.महत्वाचे म्हणजे,आचारसंहिता कालावधीत सरकारचे देणे बंद असते,म्हणजेच विविध योजनांच्या माध्यमातून पैश्याचे वितरण करण्यात येत नाही.अश्यातच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज,बुधवार २० मे रोजी शेतकरी कर्जमाफीवर मोठे भाष्य केले आहे.विशेषतः जून महिन्यात राज्यातील मुख्य खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात होते.या काळात शेतकऱ्यांना बियाणे,खते आणि इतर शेतीकामांसाठी नव्या पीक कर्जाची आवश्यकता असते.परंतु,जुन्या कर्जाच्या बोज्यामुळे अनेक शेतकरी बँकांच्या दारात थकबाकीदार ठरले आहेत.हीच अडचण ओळखून सरकारने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ३० जूनपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना बँकांकडून पुन्हा नवीन पीक कर्ज मिळणे सुलभ होईल, त्यामुळे लागू झालेल्या आचारसंहितेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नसून,येत्या ३० जूनपूर्वी राज्यातील बळीराजासाठी कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली जाईल,असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.कर्जमाफी हा सरकारचा पूर्वनियोजित आणि धोरणात्मक निर्णय असल्याने या प्रक्रियेत आचारसंहितेचा कोणताही कायदेशीर अडथळा येणार नाही.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत सकारात्मक असून, वित्तीय नियोजनाचा आढावा घेऊन लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना...

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यासाठी रिट याचिका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली जात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!