Tuesday, August 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआंदोलकाच्या कमरेत लाथ मारणे पोलीस उपअधीक्षकास भोवणार.. - मानवाधिकार आयोगाकडून दखल; वंचित...

आंदोलकाच्या कमरेत लाथ मारणे पोलीस उपअधीक्षकास भोवणार.. – मानवाधिकार आयोगाकडून दखल; वंचित बहुजन आघाडीने आयोगाकडे केली तक्रार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांनाच जालना शहरात स्वातंत्र्यदिनी लोकशाहीला लाजवेल,अशी घटना उघडकीस आली होती.स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्री पंकजा मुंडे जालन्यात गेल्या असता त्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या आंदोलकांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलनकर्त्याला पकडुन नेत असतांनाच पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी)अनंत कुलकर्णी यांनी मागून धावत जात बुटांसह सिनेस्टाईलने अमित चौधरी या आंदोलकाच्या कंबरेत लाथ मारली होती.आंदोलन कर्त्याला लाथ मारल्याने समाज माध्यमांवर घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले होते.प्रकरणी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांचेवर कारवाईची मागणी करण्यात आली होती.अश्यातच आता आंदोलकाच्या कमरेत लाथ मारणे पोलीस उपअधीक्षकास भोवणार आहे.सदर प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. आंदोलकाच्या कमरेत लाथ मारणे म्हणजे घटनेतील मूलभूत अधिकारांचा भंग होत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीने आयोगाकडे केली. त्यानुसार मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष ए.एम.बदर यांनी दखल घेत प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून लाथ बसलेल्या आंदोलकाला नुकसान भरपाई का देऊ नये? पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्यावर फौजदारी कारवाई का करू नये,त्यांची खातेनिहाय चौकशी का करू नये,या सर्वांचा खुलासा करा,अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस आयोगाने अतिरिक्त मुख्य गृह सचिव व जालना पोलीस अधीक्षकांना पाठवली आहे.पुढील सुनावणीआधी या नोटीसचे उत्तर द्या.असेही आयोगाने आदेशात नमूद केले आहे.त्यामुळे येत्या काळात पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांचेवर कारवाईची टांगती तलवार अटळ आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!