Thursday, September 3, 2026
Homeनागपूरअवैध पॅथॉलॉजी लॅब्समुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ; जनहित याचिका दाखल

अवैध पॅथॉलॉजी लॅब्समुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ; जनहित याचिका दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अवैधरीत्या पॅथॉलॉजी लॅब्स सर्वत्र सुरू आहेत.सुरू असलेल्या या अवैध पॅथॉलॉजी लॅब्समुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा गंभीर आरोप यवतमाळ येथील दिगंबर पचगडे यांनी केला आहे.त्यानुसार,पचगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याबाबत जनहित याचिका दाखल केली आहे.चुकीचे किंवा बोगस अहवाल देणाऱ्या या लॅब्सवर कारवाई न झाल्यास शेकडो रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो,असे याचिकेतून स्पष्ट करण्यात आले आहे.सदरची याचिका स्वीकृत करीत न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी राज्याचे प्रधान सचिव तसेच इतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे व येत्या ७ जानेवारी २०२६ पर्यंत यावर सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.याचिकेनुसार, यवतमाळसह राज्यभरातील अनेक अवैध प्रयोगशाळांची माहिती प्रशासनाला वेळोवेळी देण्यात आली; मात्र, कोणत्याही स्तरावर कारवाई न झाल्याने न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज भासली.या याचिकेत प्रतिवादी म्हणून प्रधान सचिव,वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सचिव,आरोग्य विभागाचे प्रमुख सचिव,यवतमाळ जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक आणि शल्यचिकित्सकांचा समावेश असून न्यायालयीन दणक्याने अनेकांची धांदल उडाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!