Wednesday, June 24, 2026
Homeब्रम्हपुरीअबब...! अन् रुग्णाच्या किडणीतून निघाला अर्धा किलोचा खडा- ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी येथील...

अबब…! अन् रुग्णाच्या किडणीतून निघाला अर्धा किलोचा खडा- ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी येथील रुग्णाला किडणी स्टोनचा होता त्रास

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी :- दिवसेंदिवसहोणाऱ्या खानपाणातील बदलांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतांना दिसून येत आहेत.पूर्वी शंभर वर्षे आयुष्य जगणारे मानव आजच्या स्थितीत पन्नाशितच लुळकतात. महत्वाचे कारण म्हणजे आरोग्याची काळजी न घेणे वा त्याकडे दुर्लक्ष करून अनेक व्याधींना सामोरे जाऊन आजार बळावले जात असतात.अशाच प्रकारचे आजार ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी येथील एका रुग्णाला किडणी स्टोनचा त्रास होता.किडनी स्टोनचा त्रास वाढत जाऊन लघवीतून रक्तस्राव होऊ लागला.अखेर सर्व तपासण्या केल्यानंतर ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर तब्बल तीन तासांची शस्त्रक्रिया करून सुमारे अर्धा किलोचा खडा मूत्राशयातून बाहेर काढण्यात आला.

प्रभाकर कारू राऊत वय ५५ वर्षे रा.तळोधी असे सदर रुग्णाचे नाव आहे.त्यांना किडणीस्टोनचा आधीपासूनच आजार होता.पण एक महिन्यापूर्वी त्यांना अचानक जास्तच पोटात दुखायला लागले.लघवीतून रक्तस्राव होत असल्यामुळे त्यांनी तळोधी येथील खाजगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन सोनोग्राफी,एक्स रे काढून घेतले. शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी लगेच आस्था हॉस्पिटल गाठले.तिथे डॉ.सुमित जयस्वाल व डॉ.जयंत निकोसे यांनी अगदी कुशलतेने तीन तासांची शस्त्रक्रिया पार पाडली.रुग्णाच्या मूत्राशयातून डॉक्टरांनी अर्धा किलोचा मुतखडा बाहेर काढला.दरम्यान,त्रास होत असतानाही आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने असा आजार उदभवतो,असे डॉ.सुमित जयस्वाल यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!