Saturday, June 20, 2026
Homeगडचिरोलीअनुसूचित जातीतील लाभार्थ्यांकरीता थेट कर्ज योजना; अर्ज सादर करण्याचे आवाहन..

अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांकरीता थेट कर्ज योजना; अर्ज सादर करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय गडचिरोली अंतर्गत थेट कर्ज योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील मांग/मातंग/मादगी/मादीगा सह समाजातील बारा पोट जातीतील लाभार्थी करीता उद्दिष्ट प्राप्त झालेले असून इच्छुक लाभार्थ्यांनी २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्हा कार्यालय गडचिरोली येथे प्रत्यक्ष येऊन रीतसर अर्ज सादर करावे. लाभार्थ्याशिवाय इतर व्यक्ती कडून अर्ज स्विकारण्यात येणार नाही.महामंडळास प्राप्त उद्दिष्टाच्या अधीन राहून थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात येणार आहे.कर्ज प्रकरण १ लक्ष च्या मर्यादित मंजूर करण्यात येईल.योजनेतील अटी,शर्ती व अधिक माहितीकरीता कार्यालयाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आय.टी.आय.चौक,एल.आय.सी.रोड, गडचिरोली या पत्त्यावर संपर्क साधावे; असे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या)गडचिरोली यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!