उद्रेक न्युज वृत्त :-अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला सुटी देणे केरळमधील एका शाळेला महागात पडले. राज्याच्या सीपीएम सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. तसेच या संदर्भात २४ तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.विशेष म्हणजे डाव्या सरकारने केरळमधील शैक्षणिक संस्था आणि सरकारी कार्यालयांना सुटी जाहीर केली नव्हती.या प्रकरणात राज्यातील कासारगोड जिल्ह्यातील कुडलू येथील श्रीगोपालकृष्ण हायस्कूलने विद्यार्थ्यांना सुटी जाहीर केली होती.यानंतर मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी याप्रकरणी कारवाई करत सार्वजनिक शिक्षण महासंचालकांकडून अहवाल मागवला आहे.अधिकृत सूचना नसताना शाळेने सुटी कशी जाहीर केली,याची उत्तरे मागविण्यात आली आहेत.शिवनकुट्टी यांनी सार्वजनिक शिक्षण संचालकांना २४ तासांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत शाळा प्रशासनाने अर्ज केला असला तरी त्याला अधिकृत मान्यता देण्यात आली नसल्याचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकृत सूचना नसतांना शाळेने सुट्टी जाहीर केली कशी?-सरकारने विचारला जाब…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

