Tuesday, August 25, 2026
Homeब्रम्हपुरीअतिक्रमण भोवले; सरपंच व तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र..

अतिक्रमण भोवले; सरपंच व तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी तालुक्याच्या खेड(मक्ता) ग्रामपंचायतीचे सरपंच व तीन सदस्यांना शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण करणे भोवले आहे.अतिक्रमण केल्याचे सिद्ध होताच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम१४ (१) (ज-३)अंतर्गत चिमूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चौघांनाही तात्काळ अपात्र घोषित केल्याने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.अपात्र झालेल्यांमध्ये सरपंच दीक्षा जयदेव भजनकर,सदस्य सुनीता मुरलीधर सावस्कर,भोजराज शिवराम बारसगाडे व चंद्रकला घनश्याम गोनाडे यांचा समावेश असून चौघांच्याही कुटुंबीयांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून पक्की घरे बांधली होती.विशेष म्हणजे,ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज दाखल करतांना अतिक्रमण केलेल्या जागेचा उल्लेख करण्यात आला नव्हता.त्यामुळे ग्रामस्थ नितीन मेश्राम व सचिन यशवंत मेश्राम यांनी ॲड.किशोर चोपकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीनंतर ब्रम्हपुरीचे तहसीलदार व वन विभागाकडून अहवाल मागविण्यात आले.त्यानंतर सदरचे प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी चिमूर यांच्याकडे वर्ग करण्यात आले.प्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी पार पडली.त्यात सरपंचासह तीन सदस्यांनी  शासकीय कुरण व वनविभागाची जमीन यावर अतिक्रमण केल्याचे सिद्ध होताच चिमूर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून चौघांनाही अपात्र घोषित केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!